Breaking News

ओडिसातील रेल्वे अपघाताबद्दल सोनिया गांधी यांनी व्यक्त केला शोक रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश

ओडिसातल्या बालासोरे येथे शुक्रवारी रात्री उशिरा तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अशी भावना व्यक्त केली.

ओडिसातल्या बालासोरमध्ये झालेला अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह आहेत, असं म्हणत सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ओडिशा अपघातातील मृतांची संख्या २६१ झाली आहे. ओडिशामध्ये शुक्रवारी तीन ट्रेन्सचा अपघात झाला आहे. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढते आहे.

ओडिसा राज्यात शुक्रवारी दि. २ जून रोजी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातात सकाळपर्यंत २३३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची दुःखद बातमी हाती आली, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे कळते. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस १० ते १२ डबे आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे तीन-चार डबे ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ एकमेकांवर धडकले. या अपघातानंतर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिसामध्ये एकदिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. ओडिसामध्ये झालेला अपघात हा मागच्या दोन दशकातील सर्वात मोठा अपघात आहे. १९९९ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची माहिती रेल्वे मंत्रालयात पोहोचल्याच क्षणी लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले. पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात अनेक मोठ्या अपघातांची नोंद झाली आहे.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांच्यात औरंगजेबाची वृती

लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रासह देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध राजकिय पक्षांकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *