Breaking News

ओडिशा बालासोर रेल्वे अपघातातील मृतकांच्या संख्येत वाढ तर ९०० प्रवासी जखमी राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक

ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-बंगरूळू आणि मालगाडी असा तिहेरी रेल्वे गाड्यांचा ओडिसा बालासोर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू तर ९०० जण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला. अपघात इतका भयंकर आहे की परिस्थिती पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. अपघाताचे वृत्त कळताच अनेक बचाव यंत्रणा कामाला लागल्या. तसेच जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय घटनेचे वृत्त कळताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मदत आणि बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागत आहेत. हा अपघात पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने त्याने पाहिलेली परिस्थिती सांगितली आहे जी अंगावर काटा आणणारी आहे.
एका खाजगी वृत्तसंस्थेने या विषयीचे वृत्त दिले आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही ५० झाली आता एका खाजगी वृत्तसंस्थने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे. तीन ट्रेन्सचा अपघात झाल्याने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

तसेच अपघाताची माहिती मिळताच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यानंतर रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून ही राजकारण करण्याची वेळ नसल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.

ओडिशात बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शेकडो प्रवासी जखमी झाले. ओडिशामध्ये तीन ट्रेन्सचा अपघात झाला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचा दौरा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ओडिशामध्ये जाऊन अपघातातीली जखमींची विचारपूस करणार आहेत. ओडिशा मेडिकल कॉलेज रुग्णालयात ते जाणार आहेत. ओडिशामध्ये तीन ट्रेन्सचा अपघात झाला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचा दौरा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ओडिशामध्ये जाऊन अपघातातीली जखमींची विचारपूस करणार आहेत. ओडिशा मेडिकल कॉलेज रुग्णालयात ते जाणार आहेत.

ओडिशा रेल्वे अपघात वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे अपघातात जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळावा म्हणून मी प्रार्थना करतो. तसंच अपघात झालेल्यांना लवकरात लवकर सगळी मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत, या आशयाचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफने बोगींच्या मध्ये चिकटलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते.

ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरून चेन्नईला रवाना झाला होती. आज ( २ जून ) ओडिशातील बहनागा स्टेशनजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोरा-समोर आली. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून खाली घसरले. ही माहिती मिळताच बचावकार्यचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं.

स्थानिकांच्या मदतीने पथकांकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेरूळ रिकामा करण्याचं काम सुरु आहे. ५० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीचएसी, खांटापाडा पीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
एकाच रूळावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोर आल्याने हा अपघात झाला आहे. सिग्नलच्या तांत्रिक कारणामुळे मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याचं सांगितलं जात आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नव्या न्यायसंहिता आणि टेलिकम्युनिकेशन कायद्याला राष्ट्रपतींची मंजूरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संसद सुरक्षेचा भंग करत ११ डिसेंबर रोजी दोन देशातील तरूणांनी थेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *