Breaking News

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, …पण त्याची दिशा बदलली खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात अर्धातास चर्चा

भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज ३ जून रोजी नववा स्मृतिदिन. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी सूचक वक्तव्य करत म्हणाल्या “इथे वादळ येणार होतं, पण त्याची दिशा बदलली, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही राजकारण्याला किंवा बलाढ्य नेत्याला निमंत्रण दिलं नाही. फक्त भजन किर्तन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. त्या नात्याने एकनाथ खडसे गडावर आले होते. कारण, एकनाथ खडसे कोरोनात येऊ शकले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडेंचे सहकारी असल्याने दर्शनाला आले होते, असं स्पष्टीकरणही यावेळी दिले.

पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन होतं. मी वादळाची लेक आहे. इथे वादळ येणार होतं. मात्र, त्याची दिशा आता बदलली आहे. असं आमचं आयुष्य आहे, असं विधानही केले.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचा दिल्लीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडाच माझ्या एकट्याचा पक्ष आहे. महादेव जानकरांचा स्वत:चा पक्ष आहे. तसा भाजपा कुणा एकट्याचा नाही. हा पक्ष खूप मोठा आहे. मी त्याची एक कार्यकर्ती आहे, जर वेळ आली तर मी माझ्या भावाच्या पक्षात जाईन आणि कारण भावाचा पक्ष हा माझे माहेर असल्याचे वक्तव्य केले होते.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *