Breaking News

राजकारण

राहुल नार्वेकर स्पष्टोक्ती, निकालपत्रात दोन महिन्याचा उल्लेखच नाही…. विधिमंडळाच्या सार्वोभौमत्वाशी तडजोड नाही

राज्यातील सत्तासंघर्षातील शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर आणि अपात्र आमदारांच्याबाबत मे महिन्यात निकाल देऊनही अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकाल दिला नाही. या विरोधात ठाकरे गटाच्यावतीने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नव्याने वेळापत्रक सोमवारपर्यंत दाखल करण्याचे आदेश देत दररोज सुनावणी घेऊन दोन महिन्यात अंतिम …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’… ओबीसी जागर यात्रेच्या समारोपप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका

ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा समारोप …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, … मुलांनी करायचं काय? पाच महिन्यांत १९ हजार ५५३ तरूणी, महिला बेपत्ता

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सरकार गंभीर नाही आहे. राज्य सरकारकडून आरोग्य विभाग, शैक्षणिक आणि पोलीस दलात सरकारच्या वतीने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत चार विभागात ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, टोलनाक्यांवर सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे कॅमेरे कशासाठी? सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही

राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी मंत्री …

Read More »

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केले “हे” प्रसिध्दी पत्रक व्हीडिओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री पदाचे त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार काहीजण युनोचेही अध्यक्ष म्हणून जाहिर केले तर मला हरकत नाही असे सांगत अजित पवारांना लगावला टोला

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली. अजित पवारांच्या अगोदर स्वपक्षाला खिंडार पाडत भाजपासोबत घरोबा केलेले एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अशात भाजपा नेतृत्व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, शिंदेंना हटवून पवारांना मुख्यमंत्री पदी बसवणार का? असा प्रश्नही …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, निर्णय तात्काळ मागे घ्या, विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवा इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातीवर उधळपट्टीसाठी ३१ कोटी

राज्य सरकारने कंत्राटी पध्दतीने शिक्षक भरती व कमी पटसंख्येच्या शाळा बंद करुन समूह शाळा विकसित करण्याबाबतचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणारा आहे. या निर्णयाला शिक्षण क्षेत्रात सर्व स्तरावरुन प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्यांचे धोक्यात येणारे भवितव्य वाचविण्याचा विचार शासनाने करावा, या निर्णयाला स्थगिती द्यावी, …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालत आहे पण पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करुन तरुणांसोबतच महाराष्ट्राच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका, …

Read More »

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …

Read More »