Breaking News

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, राम मंदिर…

मागील दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास चार ते पाच मोठ्या घटना घडल्या. त्यातील राजपथाला कर्तव्य पथ असे नामकरण करणे, नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन, आणि राम मंदिराची अयोध्येत उभारणी करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या गैरहजेरीत हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले. वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच दुसऱ्याबाजूला देशाच्या राष्ट्रपती पदावर पहिल्यांदाच एक महिला विराजमान झालेली असताना देशातील तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुख पद आणि घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मात्र देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कोणतीही कटूता न दाखविता केंद्र सरकारने केलेल्या कामाचे कौतुक आणि जनतेला शुभेच्छा संदेश देत म्हणाल्या की, यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी राष्ट्राच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरलेला आहे. राम मंदिर लोकार्पण महिला विधेयक, जी-२० शिखर परिषद आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, याच आठवड्यात अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील आपण ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार ठरलो. अयोध्येत एक भव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे. या घटनेला एका व्यापक दृष्टीकोनातून पाहिले तर आपल्या दिसेल की, भविष्यात भारताच्या नागरी संस्कृतीचा पुर्नशोध घेण्यासाठी ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जमिनीबाबतचा निकाल दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराची वास्तू केवळ लोकांच्या श्रद्धेचाच नाही, तर न्यायालयीन प्रक्रियेवरील लोकांच्या प्रचंड विश्वासाचा पुरावा म्हणून पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादनही यावेळी केले.

तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुढे बोलताना म्हणाल्या की, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून ठाकूर यांचा नेहमीच उल्लेख केला जात असल्याचेही यावेळी नमूद केले.

पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिवस म्हणजे आपल्या मुलभूत मूल्यांचे आणि तत्त्वांचे स्मरण करण्याचा प्रसंग. जेव्हा आपण त्यापैकी कोणत्याही एका तत्त्वाचं चिंतन करतो, तेव्हा आपोआपच तत्त्वांची दिशाही आपल्याला मिळते. संस्कृती, श्रद्धा आणि रीतीरिवाजांची विविधता आपल्या लोकशाहीतून ध्वनित होते. विविधता साजरी करण्यातून समता ध्वनित होते, आणि त्या समतेला न्यायाचा आधार असतो. हे सर्व शक्य होतं ते स्वातंत्र्यामुळे. या सर्व मूल्यांची आणि तत्त्वांची समग्रता हीच आपल्या भारतीयत्वाचा पाया आहे. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या परिपक्व विचारांनी मार्गदर्शित, या पायाभूत मूल्यांनी आणि तत्त्वांनी प्रेरित अशा संविधानाच्या गर्भितार्थाने, आपल्याला सर्व प्रकारच्या भेदभावांना समाप्त करण्यासाठी सामाजिक न्यायाच्या मार्गावर सातत्याने मार्गस्थ ठेवल्याचेही सांगितले.

देशाने वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीवर बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, भारत चंद्रावर पोहोचला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला, तोही याचवर्षी. चांद्रयान-3 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सौरमोहीमही उघडली. नुकतेच, आदित्य L1 ला हेलो कक्षेमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले . एक्स्पोसॅट या आपल्या पहिल्या एक्स रे पोलॅरिमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणानं आपल्या वर्षाची सुरुवात झाली आहे. हा उपग्रह कृष्णविवरासारख्या अवकाशीय रहस्यांचा शोध घेणार आहे. या वर्षभरात म्हणजे २०२४ मध्ये आणखी अनेक अवकाश मोहिमा काढण्याचं नियोजन आहे. भारताच्या अंतराळ प्रवासात नवे मैलाचे दगड पार होणार आहेत हे सांगताना मला आनंद होत असल्याचे सांगत याच वर्षी महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या विधेयामुळे देशातील स्त्री-पुरुष समानतेबाबत निश्चित असा विश्वास देशातील महिला वर्गांमध्ये निर्माण करण्यात आपल्याला यश आल्याचेही यावेळी आवर्जून नमूद केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *