Breaking News

नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनात आता शरद पवारांचीही उडी भेट दिल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करण्याचे पवारांचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील संभावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवित काही स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्याविषयीची कैफियत मांडली. यासंदर्भात नाणार  प्रकल्पाच्या ठिकाणी १० मे रोजी जाणार असून तेथील स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबतची भूमिका जाहीर करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

नाणार येथील प्रकल्पग्रस्तांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी वरील माहिती दिली.

त्यामुळे याप्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेबरोबर आता शरद पवार हे ही सहभागी होणार आहेत. यामुळे आगामी काळात नाणार प्रकल्पावरून राजकारण भलतेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाणार प्रकल्पाच्या अनुषंगाने नाणारचे सरपंच ओकांर प्रभुदेसाई, अजित यशवंतराव, अरविंद सामंत-शेतकरी यांच्यासह अन्य गांवकरी उपस्थित होते.

 

काँग्रेसही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने : भाई जगताप

नानार प्रकल्प संदर्भात शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटायला आले आहेत. आमची स्पष्ट भूमिका आहे की स्थानिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचा जर विरोध असेल तर त्यांची सरकारने समजूत काढली पाहिजे. ठाणे पासून ते कोकणापर्यंत अनेक केमिकल्स प्रकल्प आले. त्याला कोकणातील लोकांनी विरोध केला नाही. मात्र त्यांच्या जमिनी उध्वस्त करून हा प्रकल्प आणू नये अशी भूमिका काँग्रेस नेते अशोक भाई जगताप यांनी मांडत नाणार प्रकल्प जाणार अशी काँग्रेसचीही भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *