Breaking News

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, आम्हाला पाच दिवस आधीच कळाले होते…

२५ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्यानंतर कर्पुरी ठाकूर यांच्या जनमशताब्दी वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राजद आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घराणेशाहीच्या मुद्यावरून काँग्रेससह राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करत पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले. त्यानंतर आज अधिकृतरित्या काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्यावरील महागंठबंधन सरकारचा राजीनामा सकाळी देत दुपारी भाजपाच्या पाठिंब्याखालील राज्य सरकार स्थापनेचा दावा केला.

या सगळ्या घडामोडीत एक दिवसीय उत्तराखंडच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी बिहारमधील घडामोडींवर संवाद साधला. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, बिहारचे जनता माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या रंग बदलू वृत्तीला आणि धोकेबाजीला कधीच माफ करणार नाही अशी टीका केला.

यावेळी पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, नितीशकुमार हे परत भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीत पुन्हा परतणार याची माहिती आम्हाला पाच दिवसांपूर्वीच मिळाली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असून भाजपाच्या मदतीने पुन्हा बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नाची माहिती दिली होती. त्यामुळे नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार अपेक्षितच होते असेही सांगितले.

मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीकडून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या तयारीच्या अनुषंगाने फारशी माहिती घटक पक्षांना देण्यात येत नव्हती. त्यामुळे नितीशकुमार हे काँग्रेसवर नाराज होते असे सांगण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचेही राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.

तर जयराम रमेश यांनी एक्स मायक्रो ब्लॉगिंग साईटवर पोस्ट करत म्हणाले की, नितीशकुमार यांच्या सततच्या राजकिय जोडीदार बदलण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी शॅमेलियन सरड्यावरही मात केली असल्याची खोचक टीका केली.

दरम्यान, १७-१८ महिन्यापूर्वी नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडत पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसबरोबर आघाडी करत इंडिया आघाडीची स्थापना करत भाजपाच्या विरोधात लढा देण्याची घोषणा केली. परंतु इंडिया आघाडी स्थापनेला एक वर्षही पूर्ण होत नाही. तोच इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एकदा भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केल्याने नितीशकुमार यांच्यावर पलटू आणि संधीसाधू राजकारणी म्हणून टीका करण्यात येत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *