Breaking News

ॲड प्रकाश आंबेडकर यांचे नरेंद्र मोदी यांना प्रश्नावली, सांगा वाचवाल ना? जी २० परिषदेच्या निमित्ताने उपस्थित केले प्रश्न

“नरेंद्र मोदींनी #G20 शिखर परिषदेमध्ये भारताची नाचक्की होता होता कसंबसं “वाचवलं”, असं एक क्षण गृहीत धरूया”, असे म्हणत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टी वाचवण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, “नरेंद्र मोदी सांगा वाचवाल ना?” असा थेट सवाल करत आठ प्रश्न अॅड प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.
पुढे ट्विट मध्ये ॲड. आंबेडकर म्हणतात,

“आशा आहे आता तुम्ही –

१. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि शेतकरी केंद्रित कृषी धोरण राबवून शेतकऱ्यांना कर्जबाजारी आणि कंगाल होण्यापासून वाचवाल.

२. कंत्राटी कामगारांचे शोषण, गैरवर्तन तसेच संरक्षण आणि मिळणाऱ्या फायद्यांचा अभावापासून वाचवाल.

३. भारताच्या वंचित आणि बहुजन समूहांना द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्यांपासून वाचवाल, ज्याला तुमचेच भाजप-आरएसएसचे गुंड प्रोत्साहन देतायेत.

४. मानवी प्रतिष्ठेला मारक असणाऱ्या हाताने मानवी मैला उचलण्यासारख्या जाती आधारित प्रथांमुळे
भारताला लाज आणण्यापासून वाचवाल.

५. पितृसत्ता, लिंगभेद, महिलांप्रती द्वेषाची भावना आणि हिंसेच्या जाचापासून महिलांना वाचवाल.

६. SC/ST/OBC चे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण तसेच OBC चे राजकीय आरक्षण वाचवाल.

७. SC, ST, OBC, EBC, DNT आणि मुस्लिम यांच्या स्कॉलरशिप व फेलोशिपमध्ये आणखी कपात होण्यापासून तसेच त्या बंद होण्यापासून वाचवाल.

८. भारताच्या धार्मिक अल्पसंख्यांक आणि आदिवासींना जातीय नरसंहारापासून वाचवाल.

सांगा, वाचवाल ना ?”

जी २० च्या निमित्ताने अॅड प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठ प्रश्न विचारले आहेत. तसेच या प्रश्नांची उत्तरही त्यांनी मागितली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रश्नामुळे देशासमोरील मुख्य प्रश्नांचीच एकप्रकारे उत्तरे मागितली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शेतकऱ्यांसाठी पुन्हा दिल्ली बंदीः सिंघू सीमेवर आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या

आपल्या न्याय हक्कांसाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफीच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *