Breaking News

सोनिया गांधी यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्री पदाचा पेच सुटलाः शनिवारी शपथविधी सिध्दरामय्या मुख्यमंत्री तर डि.के.शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

मागील तीन दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण सिद्धरामय्या की डि.के.शिवकुमार बसणार यावरून चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होऊनही पेच सुटत नव्हता. डि.के.शिवकुमार आणि सिध्दरामय्या याच्यात माघार घ्यायलाही कोणी तयार नव्हत. या दोघांमध्ये समन्वय साधण्याचे काम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी केले. पण डि.के.शिवकुमार आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडविण्यास तयार नव्हते. यापार्श्वभूमीवर अखेर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शिष्टाई केल्याने डि.के.शिवकुमार यांनी मुख्यंमत्री पदावरील दावा सोडत उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याची तयारी दाखवली. तर मुख्यमंत्री पदासाठी सिध्दरामय्या यांचे नाव निश्चित केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमके कोण होणार यावर तीन दिवस बराच खल चालला. चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र सिद्धरामय्या की डि.के. शिवकुमार कुणाचं नाव फायनल करायचं? यावर एकमत होत नव्हतं. शेवटी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी एक फोन फिरवून डि.के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय झाला. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर डि.के. शिवकुमार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले.

डि.के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदावर अडून बसले होते. सिद्धरामय्या आणि डि.के शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची भेट घेतली. तसंच राहुल गांधी आणि के.सी वेणुगोपाल यांचीही या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली होती. आपली बाजू या दोन्ही नेत्यांनी आपल्या परिने मांडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी बुधवारी रात्री उशिरा डि.के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार झाले. आता शनिवारी सिद्धरामय्या आणि डि.के शिवकुमार यांचा शपथविधी होणार आहे.

डिके शिवकुमार यांनी मागच्या चार वर्षांपासून कर्नाटकात जी कामं केली त्याचा हवाला देत मुख्यमंत्रीपद मलाच हवं हे सांगत होते. मात्र शिवकुमार यांनी देखील स्पष्ट केलं होतं की आपण पक्षाला ब्लॅकमेल करणार नाही. काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी माझ्यावर कर्नाटक जिंकून आणा अशी जबाबदारी टाकली होती. ती पण मी पूर्ण केली आहे असंही शिवकुमार यांचं म्हणणं होतं. मात्र सोनिया गांधी यांचा एक फोन आला आणि शिवकुमार हे उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *