Breaking News

पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य, मी वेगळा निर्णय घेणार वेगळ्या स्वतंत्र राजकिय पक्षाचे सुतोवाच

गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील शक्तीपीठांच्या यात्रेवर असून शिवा शक्तीने माझ्या डोक्यात घातले की लोकांचे दर्शन घे म्हणून मी आशिर्वाद घेण्यासाठी इथे आले आहे. मात्र माझा या ठिकाणी अनोखा सन्मान केला मी कोणत्याही पदावर नसताना असे माझे मोठे स्वागत केले. यातच माझी यात्रा सफल झाली. आगामी निवडणुका आधी मी यात्रा काढणार ते यावेळी काय ठरविणार असल्याचे सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कोणत्याही पदावर नसताना माझे मोठे स्वागत झाले. जेसीबीने फुले उधळली. माझी यात्रा सफल झाली पण हे शक्ती प्रदर्शन नाही असेही त्या म्हणाल्या.

तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीही नाही. असे प्रदर्शन करायला खूप मोठे ठेकेदार हाताला लागतात. तुमची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही शिवशक्ती परिक्रमा आहे. मला कुठल्याही गोष्टीचा मोह नसल्याचेही स्पष्ट केले.

मुंडे साहेब नावाचा वृक्ष तयार झाला त्या सावलीखाली मला जगायचे आहे. दोन महिने मी माझ्याकडे लक्ष दिले, माझी काही कामे करून घेतली. सध्या आपल्या देशात जाती धर्मावर वाद सुरू आहेत. पण, मी माझ्या लोकात शांतपणे जगत आहे. तुमची मान खाली जाईल असे काहीही करणार नाही असे आश्वासन देत २०२४ च्या विधानसभा निवडणूकां आधी मी यात्रा काढणार आहे, त्यावेळी मी आपल्याशी बोलेन असे सूचक व्यक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,…. पण, भाजपाची इच्छाशक्तीच नाही! मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य!

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *