Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी माफी मागावी कंत्राटी नोकरीचा शासन आदेश रद्द

कंत्राटी भरतीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच पेटलेला असताना महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त ठरत असलेला हा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला. राज्यात कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे हे पाप महायुती सरकारच्या माथी कशाला हवे? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

महायुती सरकारकडून कंत्राटी भरती सुरू असल्याचे सांगत विरोधकांनी हा मुद्दा धरून ठेवला होता. यावर शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसहित विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय २००३ मध्ये तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने काढला. पुढे २०१०, २०१४ मध्येही तत्कालीन सरकाने जीआर काढले. २०२१ मध्ये ठाकरे सरकारच्या काळातही जीआर काढण्यात आला. हे कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. मात्र, आता हेच याविरोधात आंदोलनासाठी उतरले आहेत. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरे, शरद पवारांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरूवात केली ते काँग्रेस यासाठी महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. युवकांची दिशाभूल, तसेच स्वतःचं पाप दुसऱ्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागीतली पाहिजे. ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज जनतेत जाऊन उघडं करावं लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *