मकाऊ येथील एका रेस्टॉरंटमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा एक फोटो शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपण मकाऊमध्येच कॅसिनो आणि रेस्टॉरंट एकाच ठिकाणी असल्याचे सांगत मी कधीही जुगार कधी खेळलो नाही आणि कुटुंबासमवेत असल्याचे सांगत खुलासा केला. या आरोप-खुलाशांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियेबाबत प्रसारमाध्यमांची बोलताना तो फोटो अर्धवट आणि मॉर्फ केलेला असल्याचे सांगत इतकं फस्ट्रेशन बरं नवे असा सल्लाही दिला.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, त्यांचा विरोध मी समजू शकतो. पण त्यांनी भाजपाच्या विरोध करण्यासाठी त्यांच्याकडून अर्धवट फोटो प्रकाशित केले. तसेच जर त्यांनी तो फोटो पूर्ण प्रकाशित केला असता तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे कुटुंब त्या फोटोत दिसून आले असते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपावर टीका करताना त्यांनी जर अशी टीका केली असेल तर त्यांच्यावरील टीकेची भाजपाची पातळीही घसरलेलीच राहणार आहे. परंतु त्यांना सध्या फस्ट्रेशन आलं असून त्या फस्ट्रेशनमधूनच त्यांची विकृत मानसिकता बाहेर पडत असल्याची टीका करत इतकं फस्ट्रेशन बरं नव्हे असा टोलाही लगावला.
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1726584416657699137