Breaking News

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरु होती. या चर्चेत काही काळ प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही सहभागी झाली. मात्र वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले. तर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटात काही जागांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा केला होता. परंतु या दोन्ही जागांवर समाधानकारक तोडगा न अद्याप निघाला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला न विचारताच शिवसेना उबाठा गटाने पहिली १७ उमेदवारांची यादी जाहिर केली.

काँग्रेसने सांगली, दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, भिवंडी या पाच जागांवर दावा दाखल केला होता. काँग्रेसच्या पक्षाच्या मतानुसार शिवसेनेकडे भिवंडी जागेसाठी उमेदवार आणि कार्यकर्त्ये नाहीत. तीच परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली या जागांवरही शिवसेनेची आहे. मात्र कोल्हापूर जागा काँग्रेसला सोडून इतर चार जागांवरील कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे या चार जांगावर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटात कोणताच तोडगा निघाला नाही.

तरीही शिवसेना उबाठा गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांची उमेदवारी थेट जाहिर करण्यात आली. तसेच ठाणे येथील उमेदवारही जाहिर केला. या पार्श्वभमीवर या परस्पर उमेदवार जाहिर करण्यावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती.

त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून उमेदवारांची घोषणा करतील असे प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहिर केले. मात्र अखेर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला न विचारताच शिवसेना उबाठा गटाने परस्पर त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी आज जाहिर केली. त्यामुळे अखेर काँग्रेसने स्पष्ट भाषेतच शिवसेना उबाठा पक्षाच्या या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली.

याबाबत बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, अशी भूमिका यावेळी जाहिर केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *