Breaking News

समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान मोदींकडून शोक मुख्यमंत्री शिंदेंकडून पाच लाख तर पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहिर

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी २ लाख आणि जखमींसाठी ५० हजाराची मदत जाहिर केली.

या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तत्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त करत २ लाखांची मदत जाहिर

तर या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेनं अतिशय दु:ख झाले आहे. अपघातातील ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत,” असं ट्वीट पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने केलं आहे.

बुलढाणा बस दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येईल,” असेही पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अपघातावर ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबाबरोबर माझ्या सहवेदना आहेत. स्थानिक प्रशासनाद्वारे जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थन करतो, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *