Breaking News

प्रदेश संघटनमंत्रीपदी विजय पुराणिक यांची नियुक्ती रवींद्र भुसारी यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात पक्ष आणि सत्तेतील नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाल्याने प्रदेश भाजपच्या संघटन मंत्री पदाचा रवीद्र भुसारी यांच्या नाराजीनामा नाट्याच्या आठ महिन्यानंतर या पदावर विजय पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली असून पुराणिक यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले.

विजय पुराणिक यांची महाराष्ट्रासोबत गोव्याच्याही भाजपा प्रदेश सरचिटणीस ( संघटन ) पदी नियुक्ती केली आहे. प्रदेश संघटनमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी विजय पुराणिक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक म्हणून जबाबदारी होती.

पुराणिक यांनी १९८७ साली संघाचे प्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली. मुरबाड तहसील प्रचारक, धुळे आणि नगर जिल्हा प्रचारक, संभाजीनगर व लातूर विभाग प्रचारक, देवगिरी प्रांत सहप्रचारक व प्रांत प्रचारक तसेच पश्चिम क्षेत्र सहप्रचारक व प्रचारक या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *