Breaking News

पलुसमध्ये भाजपची माघार मात्र पालघर मध्ये शिवसेनेचा नकार भाजपची राजकिय कोंडी

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. या निवडणूकीत काँग्रेसकडून कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा शिवसेनेने पाठिंबा देत उमेदवार न देण्याचे जाहीर करत पाठिंबा दिला. मात्र भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना सुरुवातीला कदम यांच्या विरोधात दिलेली उमेदवारी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मागे घेतली. त्यामुळे विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु दुसऱ्याबाजूला पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला माघार घेण्याची केलेली विनंती शिवसेनेने धुडकावून लावत श्रीनिवास वणगा यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

विधान परिषद, लोकसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील राजकिय समिकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजपने स्व. खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडत दुसऱ्या उमेदवाराची शोधाशोध सुरु केली. त्यामुळे वणगा कुटुंबियांनी शिवसेनेशी थेट संधान बाधत शिवसेनेची उमेदवारी मिळविली. त्यातच वणगा यांना दिलेली उमेदवारी शिवसेनेने मागे घ्यावी यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधल्या धुरीणांनी प्रयत्न केले. मात्र भाजपवर कुरघोडी करण्याच्या सतत प्रयत्नात असलेल्या शिवसेनेने भाजपच्या विनंतीला केराची टोपली दाखविली. पालघर लोकसभा मतदारसंघातील याच पध्दतीची रणनीती शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणूकीत आणि भंडारा-गोंदीया या लोकसभा मतदारसंघात अंवलंबण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अंडरस्टँडींग झाल्याने या सर्वच ठिकाणी भाजपला निवडणूका अवघड जाण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपची पुरती कोंडी झाली असून भाजपची ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलूस विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तरीही भाजपसमोर निर्माण झालेली राजकिय कोंडी फुटण्याची शक्यता समोर दिसत नाही.

Check Also

शरद पवार यांची खोचक टीका, …नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे

नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *