Breaking News

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून या प्रमुखांवर मतदारसंघाची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ‘’महाविजय अभियान २४’’ चे प्रदेश संयोजक आ. श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत.

मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतो, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आ. राहुल कुल, पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ, मुंबई उत्तर साठी आ. योगेश सागर, मावळ साठी आ. प्रशांत ठाकूर आदींची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

विधानसभा मतदारसंघ निहाय जबाबदारी सोपविण्यात आलेले निवडणूक प्रमुख खालील प्रमाणेः-

लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सोपविण्यात आलेल्या प्रमुखांची यादी खालीलप्रमाणेः-

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *