Breaking News

अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, सगळेच काही संजय राऊत नसतात… संजय शिरसाट राष्ट्रीय नेते अजित पवार शरद पवार भेटीवर लगावला टोला

राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता अंबादास म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रात त्या भेटीबाबत गंमत जमंत असा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे माझ्या मनात काही शंका नाही. पण सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे. याशिवाय शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले, ते राष्ट्रीय नेते त्यांच्या अंदाजावर मी काही बोलू शकत नाही असे सांगत सगळेच काही संजय राऊत नसतात असे मोठे विधान करत अनेकांच्या चर्चेतील हवाच काढून घेतली.

अंबादास दानवे म्हणाले, त्या भेटीबाबत माझ्या मनात शंका नसली तरी सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत माझ्या मनात शंका नसली तरी, सर्वसामान्यांच्या मनात शंका असून ती दूर करता येत नाही.

दानवे यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील मंठा येथे ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचं उदघाटन करण्यात आलं यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ईडीच्या दबावामुळे जयंत पाटील यांच्यावर दबाव येत असेल. सगळे संजय राऊत नसतात, असं सांगत अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला.

हसन मुश्रीफ यांचं काय झालं ते आता मंत्री झालेले आहेत. त्यांच्यावरील ईडी कारवाईचं काय? दिलीप वळसे पाटील यांना देखील नोटीस आली होती त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं, असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
संजय शिरसाट यांनी दावा केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे म्हणाले, संजय शिरसाट हे राष्ट्रीय नेते त्यांच्या अंदाजावर मी काही सांगू शकत नाही असा खोचक टोलाही लगावला.

तसेच शिंदे गटातील १५ आमदार ठाकरे यांच्या संपर्कात या रोहित पवार यांनी केलेल्या वक्त्यव्याबाबत विचारले असात अधिक बोलण्याचे टाळत या आमदाराबाबत रोहित पवार यांनाच माहीत असं सांगत वेळ मारून नेली.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *