Breaking News

जी-२० साठी मोदी सरकारच्या कृत्यावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र भटक्या कुत्र्यांना बांधले, मार्गावरील झोपडपट्ट्या झाकल्या

आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी-२० देशाच्या राष्ट्रप्रमुखांची दोन दिवसीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमी मोदी सरकारने परिषदेसाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशाची गरीबी आणि रस्त्यावरील भटकी कुत्री दिसू नयेत यासाठी दिल्लीत रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांना लपविण्यासाठी लांबलचक पडदा बांधण्यात आलेला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना जबरदस्तीने पकडून त्यांना जनावरांच्या अॅम्ब्युलन्समधून हलविले जात आहे. तसेच दिल्लीतील रस्त्यांवर फक्त मोदींची छायाचित्र असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या या वर्तुणूकीवरून सध्या परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

जी-२०’ समूहाची शिखर परिषदेसाठी ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. या विदेशी पाहुण्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांघी म्हणाले, भारताचे वास्तव लपविण्याची गरज नाही असे सांगत खडसावले आहे.
ट्वीटर अकाउंटवर राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकार आमचे गरीब लोक आणि प्राण्यांना लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाहुण्यांपासून भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही.

तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरून मोदी सरकारला लक्ष्य करण्यात करताना, जी-२० पूर्वी मोदी सरकारने आपलं अपयश लपविण्यासाठी नागरिकांच्या घरावर शेडनेट टाकण्याचं काम केलं आहे. कारण, राजा गरीब लोकांचा द्वेष करतो, अशी टीका मोदी सरकारवर केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *