Breaking News

मुंबईतील डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा शिंदे-भाजपा सरकारचा निर्णय भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांची माहिती

मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणा-या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डबेवाला ट्रस्ट अध्यक्ष उल्हास मुके, डबेवाला असोसिएशन अध्यक्ष रामदास करवंदे आदी उपस्थित होते.

आ.भारतीय यांनी सांगितले की, १८९० पासून मुंबईमध्ये सेवा पुरवणाऱ्या डबेवाल्यांना मालकीची घरे मिळावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या बाबत आपण विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी फडणवीस यांनी डबेवाल्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नुसार आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. म्हाडा, सिडको तसेच महसूल विभागाकडून जागा घेऊन डबेवाल्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

डबेवाल्यांना त्यांची सेवा देणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी त्यांना घरे देण्यात येतील,असेही आ.भारतीय म्हणाले. डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न शिंदे- भाजपा सरकारने अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आणि मार्गी लावला त्याबद्दल आ. भारतीय यांनी फडणवीस यांचे आभार मानले. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी उपयुक्त असलेले मुंबई डबेवाला भवन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आ. भारतीय म्हणाले.

Check Also

आदित्य ठाकरे यांचे उद्विग्न उद्गार ,… आणि भ्रष्टाचार पाहून मी थक्क झालो

मुंबईतील कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी खटला दाखल करून घेत मुंबई महापालिका आणि शिवसेना उबाठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *