Breaking News

२०२६ पर्यंत मुंबईच्या ५ एन्ट्री पॉइंटवर टोल वसूल करण्याचा अधिकार मुंबई टोलमुक्त करा, अनिल गलगली यांची मागणी

मुंबईतील ३१ फ्लाईओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या ५ प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या रु २२४२.३५/- कोटीस एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएसआरडीसीने दिली आहे. वर्ष २०२६ पर्यंत मुंबई टोलमुक्त होऊ शकते कारण तोपर्यंत मुंबईतील ५ एन्ट्री पॉइंटवर टोल वसूल करण्याचा अधिकार आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईच्या पाच प्रवेश नाक्यावर वसूल केल्या जाणा-या टोल वसूली बाबत वर्ष २०१६ मध्ये माहिती मागितली होती. एमएसआरडीसीनी अनिल गलगली कळविले की वर्ष २०१०-११ पूर्वी एमएसआरडीसी स्वत: टोल वसूल करत होती. वर्ष १९९९-२००० मध्ये रु 28.35/- कोटी, वर्ष २०००-२००१ मध्ये रु ५६.५७/- कोटी, वर्ष २००१-२००२ मध्ये रु ६५.१२/- कोटी, वर्ष २००२-२००३ मध्ये ४७६.८४/- कोटी, वर्ष २००८-२००९ मध्ये ६८.६५/- कोटी आणि वर्ष २००९-२०१० मध्ये २३१.३९/- कोटी वसूल केले होते तर वर्ष २००३-२००४ ते वर्ष २००७-२००८ या ५ वर्षाची आकडेवारी एमएसआरडीसी उपलब्ध नाही. वर्ष २०१०-२०११ मध्ये एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत टोल वसुलीचे कंत्राट दिले गेले असून त्याबदल्यात एमएसआरडीसीने रु २२४२.३२/- कोटी एकरक्कमी घेतली आहे. वर्ष १९९९-२००० पासून वर्ष २०१५-२०१६ या १७ वर्षात ११९ कोटी ४४ लाख ५ हजार ७५० रुपये मेंटेनेंसवर खर्च केले आहेत. एमएसआरडीसीने अनिल गलगली यांस कळविले आहे की मुंबईतील ३१ फ्लाईओवर वर एमएसआरडीसीने १०५८ कोटी ३४ लाख ६६ हजार ८८५ रुपये खर्च केले असून त्याचा खर्च मुंबईतील ५ प्रवेश नाक्यावर टोल नाका बनवून वसूल केला जात आहे. वेस्टर्न कॉरिडोरवर २२८ कोटी ७९ लाख ९५ हजार ९१६ रुपये खर्च झाले असून त्यात आरे गोरेगाव, दत्तपाडा, जीएमएलआर, जयकोच,कालीना- वाकोला, माहिम, नेशनल पार्क आणि रानी सती मार्ग या 8 फ्लाईओवरचा समावेश आहे. ईस्टर्न फ्लाईओवर अंतर्गत २४१ कोटी ४० लाख ९९ हजार ४५० रुपये हे छेडानगर, एजीएलआर, सीएसटी- कुर्ला, जीएमएलआर, गोल्डन डाइज, जेवीएलआर, नितिन कास्टिंग एंड कैडबरी, सायन आणि विक्रोळी फ्लाईओवरच्या बांधकामावर खर्च केले आहेत. ऐरोली फ्लाईओवरच्या बांधकामावर १७३ कोटी ५७ लाख ५५ हजार आणि ८९१ रुपये खर्च केले आहेत तर एलबीएस वरील कांजूरमार्ग, जेवीएलआर- गांधीनगर, जेवीएलआर- साकीविहार या फ्लाईओवरच्या बांधकामावर १२६ कोटी ९१ लाख २१ हजार ८८९ रुपये खर्च झाले आहेत. मुंबई शहरातील जेजे हॉस्पिटल, एन एम जोशी आणि सेनापती बापट मार्ग या फ्लाईओवरच्या बांधकामावर १४४ कोटी ८१ लाख ५० हजार ८६४ रुपये एमएसआरडीसीने खर्च केले आहेत. सायन पनवेल कॉरिडोर अंतर्गत १४२ कोटी 83 लाख ४२ हजार ८७६ रुपये बीएआरसी, चेंबूर-मानखुर्द लिंक रोड, खारघर,कोकण भवन, नेरुळ, तलोजा, वाशी या फ्लाईओवरच्या बांधकामावर आणि कोकण भवन येथील अंडरपासच्या रुंदीकरणावर खर्च केले आहे.

अनिल गलगली यांच्या मते यापैकी काही फ्लाईओवर वर्ष २००० च्या पूर्वीचे असून बांधकाम खर्च सरकारी तिजोरीतून झाला असताना टोल वसूली का केली जात आहे आणि एमईपी सारख्या खाजगी कंपनीस टोल मार्फत नफा कमविण्यास प्रोत्साहन दिले जाते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण आता पूर्व आणि पश्चिम या दोन्ही द्रुतगती मार्गाची देखभाल महापालिका करत आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ऑडिट करून २०२६ नंतर मुंबई टोलमुक्त करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *