Breaking News

मुंबई

ॲप आधारित टॅक्सीसाठी नियमावली येणार ; तुम्हीही सूचना पाठवू शकता मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन

ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अॅप आधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ अन्य महत्वाचे निर्णय कंत्राटी निदेशकांचे मानधन, नवे पशू वैद्यकीय महाविद्यालय, उद्योग धोरणांना मुदतवाढ

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आयआयटीच्या कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला मंजूरीही देण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयातील १०४ पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योग विभागाकडून इलेट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णयही …

Read More »

जागतिक बँक देणार महाराष्ट्रातील ‘या’ प्रकल्पांना निधी प्रकल्प सादरीकरणानंतर निधी देण्यास तत्वतः मान्यता

राज्यातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग वाढवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत करार केला आहे. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने विविध प्रकल्प सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि जागतिक बँकेने प्रकल्पांना मंजूर केलेल्या निधीव्यतिरिक्त आगामी प्रकल्पाच्या कामासाठी जागतिक बँकेने निधी देण्यास तत्वत: मान्यता दिली. जागतिक बँकेचे …

Read More »

मुख्यमंत्री कार्यालयात आले मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, फाईल पाठवायचीय इथेच इनव्हर्ड करतात का? सोबत कार्यकर्त्यांना घेऊन टेबल टू टेबल फिरत राहिले

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतीमान सरकार-वेगवान निर्णयचा नारा देत राज्य सरकार किती गतीमान काम करत आहे, याचे दाखले प्रसिध्द करण्याचा प्रयत्न नेहमीच सरकार पातळीवरून करण्यात येत आहे. मात्र आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दुपारी तीन च्या सुमारास …

Read More »

देशभक्त असल्याची… प्रतिक्रिया समीर वानखेडेंची तर पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या सहकार्य…. सीबीआयने १२ तासांपेक्षा अधिक काळ झडती घेतली

केंद्र सरकारच्या एनसीबी विभागाचे झोनल ऑफिसर म्हणून समीर वानखेडे यांनी काम पहात असताना बॉलीवूड बादशाह शाहरूख यांना याचा चिरंजीव आर्यन खान याला खोट्या केस मध्ये अडकवून २५ कोटी रूपये उकळण्याचा डाव आखल्याप्रकरणी सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करत वानखेडेंशी संबधित जवळपास ३९ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर सीबीआय समीर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी शासन कटिबध्द

मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, …

Read More »

अॅड आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर,…त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व देत नाही घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातील प्रतिक्रिया देणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक करत भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात …

Read More »

काँग्रेसच्या विजयानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आमचं कोणीच… असं समजणाऱ्यांचा पराभव उगाच आता कोणाला धडे शिकवू नका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांची फौज तळ ठोकून होती. तसेच भाजपाला निर्विवाद बहुमत मिळणार, नाही मिळाले तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याच्याही वल्गना करण्यात येत होत्या. मात्र जनतेने या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता काँग्रेसच्या पारड्यात मतांचे दान भरभरून टाकत एकहाती सत्ता …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया,…. शहाण्या जनतेचं अभिनंदन कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत निकाल जाहिर झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० आणि अपक्षांना ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा सहजपणे पार करेल, अशी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चुकीचे वातावरण पसरविणाऱ्यांना धडा… उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार

गेल्या आठ-दहा दिवसांत जाहीर सभांमध्ये मी बोलून दाखवले की कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. त्यांचे सरकार जरी असले, देशातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा, रोड शो असे कार्यक्रम जरी केले असले तरी तेथील जनतेचा जो रोष आहे तो मतांमधून व्यक्त केला जाईल अशी खात्री आम्हाला होती. तसेच मोदी …

Read More »