Breaking News

मोजो बिस्ट्रो आणि वन अबाव्ह हॉटेल मालकांची नार्को टेस्ट करा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी

शहरातील अत्यंत मध्यवर्ती असलेल्या लोअर परळ येथील मोजो बिस्ट्रो आणि वन अबाव्ह या दोन रेस्टॉरंटच्या मालकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच देत असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यामुळे या रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांबरोबर अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

साधारणतः एक महिन्यापूर्वी कमला मिल कंपाऊडमधील मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला. तसेच याप्रकरणाची चौकशी करताना हे मोजो ब्रिस्टो आणि त्याखाली असलेल्या वन अबाव्ह हे रेस्टॉरंटही अनधिकृत असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून या दोन्ही रेस्टॉरंटला वेळोवेळी नोटीसा पाठविण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तरी हे दोन्ही रेस्टॉरंट तसेच सुरु ठेवल्याबद्दल या रेस्टॉरंटच्या मालकांना पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर मनुष्टवधाचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी या दोन्ही मालकांनी नोटीस बजाविण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच देत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे दिवसेंदिवस याप्रकरणात नवनवी माहिती येत असल्याने यात सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि नेते अडकण्याची शक्यता असल्याने या दोन्ही मालकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी विखे-पाटील यांनी केली.

या आग प्रकरणी अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह महापालिकेचे १० अधिकारी व रेस्टॉरंटचे दोन मालक अटकेत आहेत. या सर्वांचीच नोर्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *