Breaking News

सकाळी सकाळी चालत्या लोकलमध्ये २० वर्षीय तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न आरपीएफ पोलिसांकडून आरोपीला अटक

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिट वाजता ही भीषण घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती, तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढल्याचे समजते.

प्रसारमाध्यमातील माहितीच्या आधारे मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. ती परीक्षा देण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. सदर घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मस्जिद स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज स्कॅन करून त्या व्यक्तीची ओळख पटलेली आहे.

दरम्यान, घटनेच्या आठ तासांनंतर आता आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याच्यावर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात टाकला म्हणून १० हजाराचा दंड कचरा टाकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

ऐतिहासिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे टॅक्सीने येवून समुद्रात कचरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *