Breaking News

अखेर मिटकर यांचे पितळ उघड याचिकेत करण्यात आला आरोप

झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली अनेक वर्ष सहमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रामभाऊ मिटकर यांच्या विरोधात अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून मिटकर यांनी मुदतवाढ मिळवण्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प रखडून पडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत नागरिकांच्या विकासापेक्षा विकासक दलाल आणि पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकारी हेच अधिक गब्बर होताना दिसत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडामधील अधिकारी केवळ मलिदा मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करीत असतात. कित्येक अधिकारी तर पदोन्नती सुद्धा नाकारताना आढळतात. असेच एक प्रकरण नुकतेच उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सहमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रामभाऊ मिटकर यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. त्याच पदावर मुदतवाढ मिळवण्यासाठी मिटकर यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून आपला कार्यभाग साधला मात्र अर्थ या सामाजिक संस्थेने ही बाब उघडकीस आणून थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे मिटकर यांच्याप्रमाणेच अनेक अधिकाऱ्यांच्या मलईदार पोस्टिंगला चाप लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Check Also

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *