Breaking News

आरोग्य

राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य

मुंबई : प्रतिनिधी विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाची साथ …

Read More »

आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ: परिक्षार्थींनी व्यक्त केला संताप आरोग्य मंत्री म्हणतात तांत्रिक अडचण आली असेल

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सुरु असलेली गोंधळाची परिस्थिती परिक्षेच्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे अनेक परिक्षार्थींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने अनेक परिक्षार्थींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारला या त्रासाचे कारणीभूत ठरविले. भरती प्रक्रियेसाठी न्याया कम्युनिकेशनला काम दिल्यापासून अर्ज भरलेल्या …

Read More »

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ …

Read More »

या उपसंचालकांच्या निरीक्षणाखाली होणार आरोग्य विभागाची लेखी परीक्षा उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती-संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जारी केले आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी …

Read More »

आरोग्य विभागाच्या परिक्षा गोंधळावर संचालकांचा खुलासा विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार-आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेल्या परिक्षेतील गोंधळ काही केल्या कमी होण्यास तयार नसून अनेक परिक्षास्तुक उमेदवारांना त्यांनी मागितलेल्या परिक्षा केंद्रापेक्षा वेगळेच केंद्रे मिळाले असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी यावर खुलासा करत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र …

Read More »

कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय …

Read More »

आजपासून मिशन कवच कुंडल अभियान : दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. …

Read More »

राज्यातील हृदयरूग्णांसाठी १२ जिल्ह्यात स्टेमी प्रकल्प: तासात उपचार शक्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

नागपूर : प्रतिनिधी हृदय विकाराचा झटका आल्यावर रुग्णांवर पहिल्या तासातच उपचार होण्याची आवश्यकता असते. स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पामुळे पहिल्या तासात उपचार करणे शक्य होईल, असे आरोग्य मंत्री सार्वजनिक राजेश टोपे यांनी आज सांगितले. ‘जागतिक हृदय दिनी आज ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाचे टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालय, कामठी, नागपूर येथून व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

आरोग्य विभागाच्या भरती परिक्षांच्या नव्या तारखा जाहिर, “त्या” क्लिपची चौकशी ९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना मिळणार हॉल तिकीट-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी परीक्षा आयोजनातील प्रचंड गोंधळामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या नव्या तारखा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केल्या. गट क संवर्गासाठी येत्या २४ ऑक्टोबरला तर गट ड संवर्गासाठी ३१ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. परंतु या परिक्षांच्या नव्याे तारखा जाहिर करण्यात आलेल्या असल्या तरी संपूर्ण …

Read More »

आरोग्य विभागाच्या गट क आणि ड वर्गासाठी या तारखेला परिक्षा उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ …

Read More »