Breaking News

मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी या चार भाज्यांचा करा आहारात समावेश स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या भाज्यांचे करा सेवन

तुमच्या काही लक्षात राहत नसेल, म्हणजे तुम्ही सारखी-सारखी गोष्ट विसरत असाल किंवा योग्य निर्णय घेऊ शकत नसाल, समजण्याची क्षमता कमजोर झाली असेल, मानसिक तणावात राहत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूचं आरोग्य जपणंही महत्वाचं आहे.

खासकरून तुम्ही शिकत असाल किंवा नोकरी करत असाल मेंदूची क्षमता वाढवणं सगळ्यात गरजेचं असतं. मेंदू बरोबर असेल तर मानसिक आरोग्य, स्मरणशक्ती वाढवण्यास, तणाव कमी करण्यास, करिअरमध्ये यश मिळवण्यात मदत मिळते. अशात मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं किंवा काय खावं? मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खाणं-पिण्याकडे खास लक्ष द्यावं लागतं. काही भाज्या यात मदत करतात.

बिटा-केरोटीन असलेल्या भाज्या

आजवर अनेक रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे की, बीटा केरोटीन इतर अॅंटी-ऑक्सिडेंटप्रमाणे मेंदूचं कामकाज सुधारतात. हे तत्व स्मरणशक्तीही वाढवतं. गाजर, फ्लॉवर आणि कलिंगड यात बिटा केरोटीन भरपूर असतं.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के, सेलेनियम आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. तसेच ब्रोकोलीमध्ये ग्लूकोसिनोलेट्स नावाचं तत्वही भरपूर असतं. यातून आयसोथियोसाइनेट्स तत्व तयार होतात. आयसोथियोसाइनेट्स ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करू शकतात. या भाजीने मेंदूची क्षमताही वाढते.

पालक

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार, पालक खाणं तुमच्या मेंदूसाठी फार फायदेशीर असतं. कारण यात व्हिटॅमिन ए, ल्यूटिन आणि केरोटीनसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. पालकमध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन के असतं, जे मेंदूच्या योग्य विकासासाठी आवश्यक आहे.

भेंडी

भेंडीमध्ये पॉलिफेनॉल्स आणि व्हिटॅमिन बी6 असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याने स्मरणशक्ती कमजोर होण्यापासून बचाव होतो. तसेच भेंडीमध्ये असलेलं लेक्टिन प्रोटीन कॅन्सरच्या कोशिकांचा विकास रोखतं. तसेच भेंडीमुळे कोलेस्ट्रॉल लेव्हलही सुधारते.

 

Check Also

पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राष्ट्रपतींचे निशाण’ (प्रेसिडेंट्स कलर) देऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *