Breaking News

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच आता सलमान खान होस्ट करत असलेल्या बिगबॉस च्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक अली मर्चंट नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. ‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानशी त्याने बिग बॉसच्या घरात नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं.

अली आणि सारा ही जोडी त्यावेळी चांगलची हिट ठरली होती या कार्यक्रमात लाईव्ह दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर जोरदार जोरदार टीका सुद्धा करण्यात आली होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. २०११ मध्ये विभक्त झाल्यानंतर अलीने २०१६ मध्ये अनमशी दुसरं लग्न केलं होतं. त्याचं हे दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. आता वयाच्या ३८ व्या वर्षी अली तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे.

अलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो गर्लफ्रेंड अंदलीब जैदीला प्रपोज करताना दिसत आहे. हे दोघं नुकतेच दुबईला फिरायला गेले होते. याच ट्रिपदरम्यान अलीने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केलं. अलीचा हा रोमँटिक अंदाज पाहून अंदलीब भावूक होते. अलीच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गेल्या वर्षभरापासून अली आणि अंदलीब एकमेकांना डेट करत आहेत. अंदलीब ही हैदराबादमधील एक मॉडेल आहे. या दोघांच्या नात्याची सुरुवात सोशल मीडियाद्वारे झाली होती. त्यानंतर हैदराबादच्या एका फॅशन शोदरम्यान ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री त्यांनांतर मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले होते.

Check Also

शाहरुख ने ज्या चित्रपटाला दिला नकार त्या चित्रपटाने केली ३ हजार कोटीची कमाई किंग खान ने नाकारलेल्या चित्रपटाने गाठली यशाची शिखरे

एखाद्या चित्रपटाची कथा इतकी जबरदस्त असते की, एखादा चित्रपटसुद्धा नशिबात असलेल्या अभिनेत्याला रोल मिळतो. त्यामुळेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *