Breaking News

कोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यात दोन अंकी असलेल्या मृतकांच्या संख्येत आज तब्बल १० ते १५ च्या संख्येने वाढ झाली आहे. त्यामुळे आज १११ मृतकांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृतकांची संख्या ४७ हजार ३५७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही आज वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६०० नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३२ हजार १७६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८८ हजार ५३७ इतकी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ५,०२७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,९५,२०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५२ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,८९,४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,३२,१७६ (१६.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४७,७९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,०७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई मनपामधील २२५० करोना बाधित रुग्णांची दुहेरी नोंद (duplicates) केंद्र शासनाच्या आय सी एम् आर पोर्टलवरून कमी केल्यामुळे मुंबई मनपा आणि राज्याच्या प्रगतीपर रुग्णसंख्येमध्ये आणि बरे झालेल्या रुग्णसंख्येमध्ये आज बदल झाला आहे. त्यामुळे राज्याची बाधित रुग्णसंख्या २२५० ने तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२३१ ने कमी झाली आहे.  आज नोंद झालेल्या एकूण १११ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ३६ मृत्यू हे पुणे -१०, नागपूर-७, नाशिक-५, औरंगाबाद-४, ठाणे-३, गोंदिया-२, अहमदनगर-१, बुलढाणा-१, पालघर-१, रायगड-१, सांगली-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८७७ २८२८१८ २० १०९१३
ठाणे ९१ ३६८७० ९२०
ठाणे मनपा १३४ ५१४८३ ११५८
नवी मुंबई मनपा १२४ ५२०८८ १०१७
कल्याण डोंबवली मनपा १४३ ५८३३४ ९३६
उल्हासनगर मनपा २४ ११००९ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६६६८ ३३९
मीरा भाईंदर मनपा ५९ २५४०६ ६२६
पालघर ४१ १६१४३ ३१७
१० वसई विरार मनपा ५३ २९२११ ५६९
११ रायगड ६१ ३६४२८ ९०८
१२ पनवेल मनपा ८८ २७००५ ५३८
  ठाणे मंडळ एकूण १६९७ ६३३४६३ ३७ १८५७४
१३ नाशिक १५२ ३१६१४ ६४४
१४ नाशिक मनपा ३४३ ६९९३३ ९३४
१५ मालेगाव मनपा १० ४३४७ १५२
१६ अहमदनगर २३१ ४४००६ ५७६
१७ अहमदनगर मनपा ५२ १९७०३ ३६२
१८ धुळे १६ ८०१३ १८४
१९ धुळे मनपा ११ ६७६९ १५२
२० जळगाव ३१ ४२३१३ १११४
२१ जळगाव मनपा १२ १२८०८ ३०१
२२ नंदूरबार २४ ७०८६ १५२
  नाशिक मंडळ एकूण ८८२ २४६५९२ १७ ४५७१
२३ पुणे ३४५ ८४३८८ १९६२
२४ पुणे मनपा ३३८ १८१२०३ ४२६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१२ ८९३१४ १२७१
२६ सोलापूर १७७ ३८९७७ ११०५
२७ सोलापूर मनपा ३८ ११३०७ ५६३
२८ सातारा १६२ ५२७२९ १६७८
  पुणे मंडळ एकूण १२७२ ४५७९१८ २० १०८४०
२९ कोल्हापूर ३३ ३४५९५ १२४१
३० कोल्हापूर मनपा १७ १३९८१ ४०४
३१ सांगली ५७ २९२१२ ११०६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५२७ ६०८
३३ सिंधुदुर्ग ५४४५ १५१
३४ रत्नागिरी १०९१८ ३६९
  कोल्हापूर मंडळ एकूण १२७ ११३६७८ ३८७९
३५ औरंगाबाद १५ १५२९६ २८३
३६ औरंगाबाद मनपा १०४ ३०१०२ ७८१
३७ जालना ७३ ११८६७ ३१५
३८ हिंगोली ३९७४ ७७
३९ परभणी ४००१ १३८
४० परभणी मनपा ३१५० ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २०४ ६८३९० १७११
४१ लातूर १९ १३२२० ४४३
४२ लातूर मनपा ३३ ९१५८ २१०
४३ उस्मानाबाद ३२ १६४२३ ५२७
४४ बीड ६० १६३३९ ४९०
४५ नांदेड १०७२० ३४५
४६ नांदेड मनपा १८ ९६७४ २६६
  लातूर मंडळ एकूण १६७ ७५५३४ २२८१
४७ अकोला १४ ४१७१ १३०
४८ अकोला मनपा २८ ५४३३ २२२
४९ अमरावती १२ ६८६८ १५५
५० अमरावती मनपा ५२ ११८०१ १९७
५१ यवतमाळ ३५ १२२५८ ३५३
५२ बुलढाणा २४ १२०५७ २०७
५३ वाशिम ३७ ६३४४ १४८
  अकोला मंडळ एकूण २०२ ५८९३२ १४१२
५४ नागपूर ९३ २७०३४ ६१२
५५ नागपूर मनपा ३२४ ८७६९६ २३९१
५६ वर्धा ४९ ८३३१ २१७
५७ भंडारा ७८ ११३५५ २२४
५८ गोंदिया ४५ १२६३५ १३०
५९ चंद्रपूर २६९ १२९४९ १८७
६० चंद्रपूर मनपा १२५ ७९७६ १४५
६१ गडचिरोली ५३ ७५६० ६२
  नागपूर एकूण १०३६ १७५५३६ १८ ३९६८
  इतर राज्ये /देश १३ २१३३ १२१
  एकूण ५६०० १८३२१७६ १११ ४७३५७

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८२८१८ २५६१७९ १०९१३ ८१४ १४९१२
ठाणे २४१८५८ २२१०१४ ५३२९ ५८ १५४५७
पालघर ४५३५४ ४३८४८ ८८६ १५ ६०५
रायगड ६३४३३ ५८५४४ १४४६ ३४३६
रत्नागिरी १०९१८ ९८९४ ३६९ ६५४
सिंधुदुर्ग ५४४५ ४९९८ १५१ २९५
पुणे ३५४९०५ ३२६९५२ ७४९४ ३४ २०४२५
सातारा ५२७२९ ४८८७० १६७८ १० २१७१
सांगली ४८७३९ ४६५३३ १७१४ ४८९
१० कोल्हापूर ४८५७६ ४६६३९ १६४५ २८९
११ सोलापूर ५०२८४ ४६५४७ १६६८ १० २०५९
१२ नाशिक १०५८९४ १०२०७३ १७३० २०९०
१३ अहमदनगर ६३७०९ ५९०९८ ९३८ ३६७२
१४ जळगाव ५५१२१ ५२५२९ १४१५ १९ ११५८
१५ नंदूरबार ७०८६ ६४४७ १५२ ४८६
१६ धुळे १४७८२ १४२६० ३३६ १८३
१७ औरंगाबाद ४५३९८ ४३१७६ १०६४ १४ ११४४
१८ जालना ११८६७ ११३१९ ३१५ २३२
१९ बीड १६३३९ १४८१२ ४९० १०३०
२० लातूर २२३७८ २०७४३ ६५३ ९७९
२१ परभणी ७१५१ ६६२४ २५५ ११ २६१
२२ हिंगोली ३९७४ ३६६२ ७७ २३५
२३ नांदेड २०३९४ १९१६१ ६११ ६१७
२४ उस्मानाबाद १६४२३ १४७४० ५२७ ११५५
२५ अमरावती १८६६९ १७३४३ ३५२ ९७२
२६ अकोला ९६०४ ८७३७ ३५२ ५१०
२७ वाशिम ६३४४ ५८९४ १४८ ३००
२८ बुलढाणा १२०५७ १११६८ २०७ ६७७
२९ यवतमाळ १२२५८ ११३१९ ३५३ ५८२
३० नागपूर ११४७३० १०७६९१ ३००३ १५ ४०२१
३१ वर्धा ८३३१ ७४२० २१७ ६९०
३२ भंडारा ११३५५ ९८९८ २२४ १२३२
३३ गोंदिया १२६३५ ११५३५ १३० ९६४
३४ चंद्रपूर २०९२५ १८१२४ ३३२ २४६८
३५ गडचिरोली ७५६० ६९८९ ६२ ५०४
  इतर राज्ये/ देश २१३३ ४२८ १२१ १५८३
  एकूण १८३२१७६ १६९५२०८ ४७३५७ १०७४ ८८५३७
निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र: तक्रारदारास १ लाख रुपयांचे बक्षिस

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *