Breaking News

एचडीएफसीने ग्राहकांना दिला मोठा झटका वाढवले कर्जाचे व्याजदर

आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी कर्ज महाग केले आहे. आता ७ सप्टेंबरपासून ग्राहकांना बँकेच्या काही निवडक कर्जांवर जास्त व्याज द्यावे लागणार आहे.

एचडीएफसीने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर ०.१५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आता ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत, ग्राहकांना आता गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादींसाठी अधिक ईएमआय भरावा लागेल.

एचडीएफसी बँकेने ७ सप्टेंबरपासून रात्रभर एमसीएलआर ०.१५ टक्क्यांनी वाढवला आहे. त्यानंतर हा दर ८.३५ वरून ८.५० टक्के झाला आहे. तर, बँकेने एका महिन्याच्या एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे हा दर ८.४५ वरून ८.५५ टक्के झाला आहे. तीन महिन्यांच्या एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के वाढ केल्यानंतर दर ८.७० टक्क्यांवरून ८.८० टक्क्यांवर आला आहे. बँकेने सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.९५ टक्क्यांवरून ९.०५ टक्क्यांवर केला आहे.

जी कर्जे जी एका वर्षाच्या एमसीएलआरशी जोडलेली आहेत त्यात ०.५ टक्के वाढ झाली आहे. हा दर ९.१० टक्क्यांवरून ९.१५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर, बँकेने एक वर्ष आणि दोन वर्षांचा एमसीएलआर ०.०५ टक्क्यांनी वाढवला आहे. पूर्वी ते ९.२० टक्के होते ते आता ९.२५ टक्के झाले आहे. सुधारित आधार दर १६ जूनपासून लागू झाला असून तो ९.२० टक्के करण्यात आला आहे. बेंचमार्क पीएलआर दर १७.७० टक्के केला आहे.

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट २०१६ मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लॉन्च केला होता. एमसीएलआर आता क्रेडिट आणि गृहकर्ज प्रदान करण्यासाठी बँकांचा अंतर्गत बेंचमार्क म्हणून लागू आहे, ज्याला फ्लोटिंग व्याज दर व्यवस्था देखील म्हटले जाऊ शकते. एमसीएलआर थेट घर खरेदीदारांनी घेतलेल्या गृहकर्ज ईएमआयशी जोडलेले आहे. त्यामुळे एमसीएलआर वाढल्याने बँकांची कर्जे महाग होतात.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *