Breaking News

अर्थसंकल्पाने केली नोकरदार आणि महिलांची निराशा नोकरदारांना कोणताही कर दिलासा नाही

नवी दिल्लीः प्रतिनिधी

सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाचे डोळे लागलेल्या देशाच्या अर्थसंकल्पातून काही तरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कर आकारणीच्या कोणत्याही रचनेत बदल न करता आहे, तोच ठेवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आज गुरूवारी अर्थसंकल्प सादर करताना केली.

त्यामुळे नोकरदार वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. त्यातच महिलांसाठी काही तरी घोषणा केली जाईल अशी अटकळ सर्वांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, महिलांसाठीही कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आली नसल्याने नोकरदार आणि महिलांसाठी दिलासादायक अर्थसंकल्प ठरला नाही.
कर रचना

उत्पन्न                                कर दर

० ते अडीच लाख                   शून्य

२.५ लाख ते पाच लाख         १० टक्के

५ लाख ते दहा लाख              २० टक्के

दहा लाख रुपयांपेक्षा जास्त    ३० टक्के

Check Also

सर्वोच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा माफीनामा न्यायालयाने मात्र फेटाळला माफीनामा

सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन यांनी एका मुलाखतीत पतंजली आयुर्वेद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *