Breaking News

केंद्राने जनतेला काय दिले… अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

काय महागणार

मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढल्यामुळे मोबाईल महागणार.

टी.व्ही.वरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने टी.व्ही महागणार.
शिक्षण व आरोग्याच्या सेवेच्या सेसमध्ये १ टक्क्यांनी वाढ केल्याने या दोन्ही सेवा महागणार.

शेती कंपन्यांना करात १०० टक्के माफी- या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी शेती क्षेत्रात पदार्पण केलेल्या रिलायन्स, गोदरेज, एअरटेल सारख्या कंपन्यांना होणार.

२५० कोटी उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना कार्पोरेट कर २५ टक्के आकारण्यात येणार असल्याने या कंपन्यांच्या सेवा महागणार.

ठेवींवरील सवलत १० हजारांवरून ५० हजारांवर.
ज्येष्ट नागरिकांना ५० हजारपर्यंत बिनव्याजी कर्ज.

घोषणा

मुंबई आणि महाराष्ट्र

मुंबईतील प्रत्येक लोकल रेल्वेत कॅमेरे बसविणार

प्रत्येक स्टेशनवर एक्सलेटर बसविणार

मुंबईच्या रेल्वेसेवा वाढीसाठी ४० हजार कोटी रूपये देणार

नागरी सुविधा

देशातील प्रत्येक गरीबाला घर देणार-५१ लाख घर उभारणीचे लक्ष्य

२ कोटी सुलभ शौचालयांची निर्मिती करणार

देशभरातील ६०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार

रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटी रूपये खर्चः तर ३६०० नवे रेल्वे मार्गाची उभारणी

वडोदरा येथे रेल्वे विद्यापीठाची स्थापना करणार

धार्मिक शहरांना हेरिटेजचा दर्जा देणार

नव्या ९९ शहरांना स्मार्ट करणार

४ कोटी घरांमध्ये सौभाग्य योजनेंतर्गंत वीज पुरवठा करणार

शिक्षण

प्री-नर्सरी ते १२ वी पर्यंत प्रत्येकाला शिक्षण देणारः डिजीटल शिक्षणाला प्रोत्साहन

आदीवासी मुलांसाठी एकलव्य शाळांची निर्मिती करणार

आरोग्य

५० कोटी गरीब नागरीकांना पाच लाख रूपयांपर्यंतचा आरोग्य विमा काढणार

टीबीच्या रूग्णांना ५०० रूपयांची मदत देणार

आरोग्य केंद्रांच्या निर्मितीसाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद

करमुक्त डायलिसीस सुविधा आणि गरीबांना मोफत डायलीसिस उपचार

शेती

शेत मालाला दिड पटीने वाढीव भाव देणार

४२ मेगा फुड पार्क बनविणार

बटाटा, कांदा या उत्पादनांना ग्रीन ऑपरेशनखाली ५०० कोटी देणार

गुंतवणूक व रोजगार

शासकिय कंपन्यांचे शेअर्स विकून ८० हजार कोटींची उभारणी करणार

दोन विमा कंपन्या शेअर्स बाजारात उतरणार

७० लाख नव्या नोकऱ्या निर्माण करणार

Check Also

एसबीआयमध्ये १२ हजार फ्रेशर्सना संधी ८५ टक्के आयटी क्षेत्रातील नवतरूणांना प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून नियुक्त्या

एसबीआय SBI, देशातील सर्वात मोठी असलेल्या बँकेत, FY25 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि सहयोगी म्हणून १२,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *