Breaking News

३ मे पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नियमाची करणार अंमलबजावणी शेअर बाजारात घबराटीचे वातावरण पसरण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी एक्स्चेंज-ट्रेडेड करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज (ETCD) साठी एकत्रित केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी एक महिन्याने विलंबित केली, ज्यामुळे या आठवड्यात बाजारात दिसणारी घबराट कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली. ब्रोकर्सनी क्लायंटला त्यांच्या डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सवर अंतर्निहित एक्सपोजरचा पुरावा सादर करण्यास किंवा त्यांच्या विद्यमान पोझिशन्स अनवाइंड करण्यास सांगितल्यानंतर भारतीय रुपयाचे विनिमय-व्यापार पर्याय बुधवार …

Read More »

आता सोने बाजारात गुंतवणूक एक चांगली सुरुवात पण… सोन्याच्या दरात ७० हजारापार गेल्यानंतर तज्ञांचे मत

विविध मालमत्ता वर्गांमध्ये विविधता आणल्याने दीर्घकाळात केवळ एक किंवा काही मालमत्तेमध्ये गुंतवणुकीच्या तुलनेत एकंदर उच्च परतावा मिळू शकतो. ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यासह सर्व मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना यावर्षी चांगला पुरस्कार मिळाला आहे. आकडेवारी दर्शवते की सोन्याच्या किमतीने ४ एप्रिल रोजी प्रति औंस $२,३०० ची पातळी ओलांडली, जो विक्रमी उच्चांक आहे. …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मविआचे सरकार राज्यात नाही तर देशात…

बुलढण्यातील प्रचार सभेतून यवतमाळ वशिंची जागा आपण जिंकणार असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात नाही तर देशात सरकार येईल, असे चित्र आहे .. भाजपाच सरकार जे डोक्यावर बसवले ते आता जनतेला नकोय .. दहा वर्ष सत्तेत असूनही विचारता की काँग्रेसने काय केले ? भाजपा केंद्रात …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी, बीडचे उमेदवार केले जाहिर

लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली असून काँग्रेसने हक्क सांगितलेल्या भिवंडीतून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर बीडमधून विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी ऐनवेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अखेर पक्षाचे कार्यकर्त्ये …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, वंचितने सातत्याने अपमान केला… देशाचे संविधान, लोकशाही महत्वाची

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला, संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे. मतविभाजन …

Read More »

संध्या सव्वालाखे यांची टीका, महिला अत्याचाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाने…

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिली, शर्पूणखा असा उल्लेख करुन महिलांचा अपमान करणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का? याचे उत्तर आधी भाजपाच्या महिला …

Read More »

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिर ओमराजे निंबाळकर -भावजय अर्चना पाटील यांच्यात लढत

उस्मानाबाद पूर्वीच्या तर आताच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अर्थात पद्मसिंह पाटील यांच्या बंधुचे सुपुत्र यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नसल्याने अखेर भाजपा आमदार राणा जगजीत पाटील यांच्या …

Read More »

अमरावतीतील उमेदवारीवरून आनंदराज आंबेडकर यांची माघार तर वंचितचा खुलासा

महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरु झाली आहे. त्यातच अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्याबाजूला प्रकाश आंबेडकर यांचे बंधू तथा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून आपला उमेदवारी अर्ज नुकताच सादर केला. मात्र या दोन्ही भावांच्या पक्षात …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, पाण्याविना परिस्थिती बिकट होत चाललीय

83 percent water storage in seven lakes of Mumbai

एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सरकारला चांगलेच सुनावले आहे. वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती नसती …

Read More »