Breaking News

Editor

महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी आता मॅग्नेटीक महाराष्ट्र फेब्रुवारीत होणाऱ्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मेक इन महाराष्ट्रनंतर पुन्हा एकदा मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात नरीमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट …

Read More »

महाराष्ट्र बंद प्रकरणी ५ हजार दलित कार्यकर्त्यांना अटक कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी संघटनांची धावाधाव

मुंबईः प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे उसळलेल्या दंगलीच्या निशेधार्थ दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या कालावधीत जवळपास राज्यभरातील पाच हजार दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र बंदच्या कालावधीत काही ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या …

Read More »

कुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’ कै. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा 'विच्छा माझी पुरी करा' ने शुभारंभ

मुंबईः प्रतिनिधी राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ‘विच्छा माझी पुरी करा‘ हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. कै. वसंत सबनीस लिखित आणि कै. दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या या चिरतरुण लोकनाट्याची पर्वणी आता कुडाळमधील रसिकांना लाभणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ‘विच्छा …

Read More »

वैभव बनला स्वामी देवा शप्पथ मालिकेत पाहयला मिळणार

मुंबईः प्रतिनिधी विनोदी अभिनेता अशी ख्याती असलेल्या वैभव मांगलेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. केवळ विनोदी भूमिका न साकारता विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याकडे त्याच नेहमी कल असतो. याच कारणामुळे तो कधी हसवतो तर कधी रडवतो. इतकंच नव्हे तर वैभवचा खलनायकी रंगही प्रेक्षकांनी पाहिला आहे. हाच वैभव आता स्वामीच्या भूमिकेत समोर …

Read More »

कोरेगाव भिमा घटनेच्या चौकशीसाठी न्यायमुर्तीची नेमणूक लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रभारी न्या. विजया ताहिलरमाणींची भेट

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील दलितांवरील दगडफेकीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीची नेणूक करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशाची नियुक्ती करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामणींची भेट घेत त्यासंदर्भात विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार लवकरच …

Read More »

शेतमाल तारण कर्ज योजनेत शंभराहून अधिक बाजार समित्या पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम आणि अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल …

Read More »

कोरेगाव भिमा येथील घटनेमागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ शिव प्रतिष्ठानचा आरोप; भिडेंचा कार्यक्रम अखेर पोलिसांकडून रद्द

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या मागे संभाजी भिडे यांचा हात नसून त्या मागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. तसेच १ जानेवारी रोजी भिडे हे कोरेगाव भिमा येथे नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी संबध असणे शक्यच नसल्याचा दावा शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या मुंबई विभागाचे कार्यवाह …

Read More »

आपची संभाजी भिडेंच्या अटकेसाठी ऑनलाईन पिटीशन प्रीती शर्मा मेनन यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी जमलेल्या दलित समाजाच्या विरोधात हल्ला करण्यासाठी उद्युक्त केल्याप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे भिडे यांना अटक करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात येणार असून या पिटीशनवर जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्या असे आवाहन …

Read More »

हसमुख चेहऱ्याचे राजकारणातील वसंत डावखरे मित्र गेले सर्व पक्षिय नेत्यांकडून शोक व्यक्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांचे मित्र तथा राजकारणातील चमत्काराची किमया दाखविणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे काल रात्री गुरूवारी निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ठाण्यातील हरी निवास येथील …

Read More »

भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविणार मुख्यमंत्र्याशी चर्चा करून धोरण तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांच्या चाव्याने झालेल्या रेबीजच्या रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज …

Read More »