Breaking News

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यास अवधी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना या सर्वच राजकिय पक्षांकडून राजकीय प्रचार, रॅली आणि रोड शो आयोजन करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी हमी, धर्म, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवरून उमेदवारांवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी, भाजपा आदींवर टीकेची एकच झोड उठविली.

या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलताना म्हणाले की, निवडणूक रोखे योजना अर्थात इलेक्ट्रोरल बाँड ही “जगातील सर्वात मोठी खंडणी योजना” आहे. “पंतप्रधानांनी कितीही स्पष्टीकरण दिले तरी फरक पडणार नाही कारण पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत हे संपूर्ण देशाला माहित आहे,” असा हल्लाबोलही यावेळी केला.

तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. परंतु ती मुलाखत स्क्रिपटेड होती. तसेच त्या मुलाखतीचा कार्यक्रम फ्लॉप शो होता. त्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रोल बाँडवरून काही खुलासे करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सगळे खुलासे खोटे होते अशी टकाही यावेळी केली.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मागील १५-२० दिवसापासून भाजपाला १५० ते २०० जागा मिळणार असल्याचे मी सांगत होतो. मात्र आता वास्तविक परिस्थिती पाहता भाजपाला १५० हून अधिकच्या जागाही मिळणार नाहीत असे असे सांगितले

वायनाडशिवाय अमेठीतून निवडणूक लढवणार का, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले, “अमेठीबाबत पक्ष निर्णय घेईल. मला जो काही आदेश मिळेल, मी त्याचे पालन करीन. आमच्या पक्षात, हे निर्णय सीईसी अर्थात केंद्रीय निवडणूक समिती बैठकीत घेतले जातात,” असेही यावेळी स्पष्ट केले.

वायनाडमध्ये २६ एप्रिलला तर अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. सध्या असे सांगण्यात येत आहे. की, केरळमधील वायनाडच्या त्यांच्या घोषित लोकसभा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त, राहुल गांधी कदाचित अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवतील, ज्याचे त्यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते, आणि प्रियांका गांधी वड्रा रायबरेली येथून, पूर्वी या जागेवरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या प्रतिनिधित्व करत होत्या.

याच पत्रकार परिषदेत बोलताना समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, संपूर्ण उत्तर प्रदेशात “परिवर्तनाचे वारे” वाहत आहे. इंडिया ब्लॉक राज्यात भाजपाचा पराभव करेल. “आज आपण गाझियाबादमध्ये बसलो आहोत. गाझियाबाद ते गाझीपूरपर्यंत इंडिया ब्लाकचा भाजपा विरोधात क्लीन स्वीप घेईल असेही सांगितले.

पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, त्यांनी (भाजपा) ‘डबल इंजिन’ अर्थात केंद्र आणि राज्यातील सरकारचे दावे केले, आता त्यांचे होर्डिंग पहा, त्यांचे उमेदवार गायब आहेत आणि फक्त एकच व्यक्ती आहे. मतदानानंतर, होर्डिंग्जवरील ती व्यक्ती देखील गायब होईल, त्यांच्याकडे खोटे बोलणे आणि लुटणे हा एकच नारा आहे. खोटे बोलणे ही त्यांची ओळख बनली आहे, अस आरोपही यावेळी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.

अखिलेश यादाव पुढे बोलताना म्हणाले की, इलेक्ट्रोल बाँडमुळे किती भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा घेतला आहे, किती भ्रष्टाचाऱ्यांना भाजपामध्ये घेतले आहे हे पुरते दिसून येत असल्याचे सांगत भाजपा हे एकप्रकारे भ्रष्टाचाऱ्यांचे गोडाऊन झाले आहे अशी टीकाही यावेळी केली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *