Breaking News

दिव्यांगासाठीच्या पर्यावरणस्नेही व्हेईकल शॉप योजनेचा शुभारंभ

दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रीमंडळ बैठकीनंतर श्रीमती पुष्पा सागर कांबळे, माणिक रामचंद्र भेरे,धनाजी बळवंत दळवी, मधुकर हरी बोंद्रे, चंचल गोपाळ दुपारे ( सर्व जि. ठाणे) या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरते दुकानांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी दिव्यांग कल्याण विभागाच्या अद्ययावत वेबसाईटचे उद्घाटन देखील करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे दिव्यांगजनांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करून देण्याच्या योजना राबविण्यात येणार आहे.
मोबाईल शॉप ऑन व्हेईकल ही राज्य शासनाची योजना या महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेत पहिल्या टप्प्यात पात्र दिव्यांगजनांपैकी ६६७ अर्जदार दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाण अतितीव्र असेल अशा दिव्यांगजनांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक जिल्हयातील दिव्यांगजनांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांची निवड केली जाते आहे.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *