Breaking News

पालघरमध्ये भाजपने जागा राखली मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिष्ठा राखली

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत लोकसभेतील संख्याबळात घट झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली पालघरची जागा भाजपला राखण्यात यश आले.

भाजपचे खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. तर चिंतामण वणगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वणगा यांनी शिवसेनेकडे धाव घेत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यातच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान भाजप-शिवसेनेकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले.

या निवडणूकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांना २ लाख ७२ हजार ७८२ आणि श्रीनिवास वणगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली. गावित यांना २९ हजार ५७२ अधिकची मते मिळल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *