Breaking News

निवडणूक आयोगावरच केस केली पाहिजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

पालघर मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत रात्रीत ८५ हजार मते कशी वाढतात? ऐनवेळी इलेक्ट्रॉनिक मशिन्स कशी बंद पडायला लागतात ? असा सवाल करत निवडणूकीच्या प्रचाराच्या काळात पैसे वाटणारे कार्यकर्त्ये भाजपच्या नेत्यांचे नाव घेतात. मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या सर्व राजकिय पक्षांनी निवडणूक आयोगावर केस दाखल करायला पाहिजे अशी मागणी करत २०१९ च्या निवडणूका या काय आयपीएलप्रमाणे घेणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.

पालघर निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालघरच्या मतदारांना दिलेले आश्वासन आपण पाळणार असून ‘शिवसेना तुमच्या सोबत राहील. पालघरवासियांना निवडणूक प्रचारात शिवसेनेने दिलेल्या शब्दापासून मागे जाणार नाही’ ‘जनतेच्या भावना जवळून पाहिल्या’ असल्याचे सांगत या निवडणूकीत ‘साम-दाम-दंड-भेद वापरुन निसटला पराभव केला गेला’ असला तरी ‘मी पराभव मानायला तयार नसल्याचेही ते म्हणाले.

शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?’ ‘शिवरायांच्या अपमानाबाबत भाजपकडून खुलासा नाही.‘जेमतेम काही हजारांनी भाजपचा विजय’ झाला असल्याचे सांगत राज्याच्या ‘घराघरामध्ये शिवसेना पोहचल्याचे सांगत केवळ ‘वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी शिवसेना ताकदीने ही निवडणूक लढली आहे.

‘सरकार चार वर्षातच खाली आल्याची टीका करत ते पुढे म्हणाले की, राज्यातील आणि देशातील २५ वर्ष सरकार जाणार नाही असे वातावरण होते. मात्र आता वातावरण बदलल्याचे सांगत २०१४ च्या निवडणुकीनंतर देशात वेगळे वातावरण होते’. आता ‘११ पैकी २ जागा सोडल्या तर सर्वत्र भाजपचा पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *