Breaking News

शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजपा सदैव तयार मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच तयार आहे. पण शिवसेनेलाच युती करायची नसेल तर पालघरमध्ये लढलो, भविष्यात इतरत्र लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी स्पष्ट केले. या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसेच भंडारा-गोंदियामधील दुष्काळामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावाही त्यांनी केला.

पालघरमध्ये निवडणुकीत दिवंगत खासदार पुत्रांना आमच्या विरोधात उतरवून मित्रपक्षाने कडवटपणा आणला. तो टाळला असता तर आनंदच झाला असता. यानंतर तरी सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी परस्परांविरूद्ध निवडणूक लढवावी की नाही याचा विचार त्यांना करावा लागेल. आम्हा दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्यामुळे ज्या पक्षांविरूद्ध सैद्धांतिक लढाई ते लढले त्यांच्याबरोबर शिवसेना जाईल, असे वाटत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणूक आयोगाने दखल घ्यावी

या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्या. त्यामुळे आमचे कित्येक मतदार आपल्या संवैधानिक अधिकारापासून वंचित राहिले. याचा मोठा फटका आम्हाला बसला. निवडणूक आयोगाने या गटनांची गंभीर नोंद घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. या मशीन बिघडल्याबद्दल विरोधकांनी आम्हाला लक्ष्य केलेच पण प्रसारमाध्यमांनीही जणू आम्हीच ईव्हीएम मशीनचे उत्पादक आहोत, असे बेछूट आरोप केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुष्काळाचाही फटका

भंडारा-गोंदियामध्ये सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कितीही मदत केली तरी तेथील लोक अस्वस्थ असतातच. या अस्वस्थतेमुळे सरकारविरूद्ध असलेली नाराजी या निवडणुकीत दिसली. हीच निवडणूक पावसाळ्यानंतर झाली असती तर चित्र वेगळे असते. हरकत नाही. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा आम्हीच जिंकमार असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *