Breaking News

कॅनडात दसऱ्याच्या मुहूर्तावर तिरंग्यात गुंडाळून पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे केले दहन

कॅनडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पीएम मोदींच्या पुतळ्यासह भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले. गेल्या महिन्यातही अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा कॅनडा आणि भारत यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे.

खलिस्तानी समर्थक शीखांनी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर तसेच टोरंटो आणि व्हँकुव्हरमधील कॉन्सुलर इमारतींच्या बाहेर बंद रस्त्यावर निदर्शने केली. जूनमध्ये खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या निषेधार्थ हे शीख जमा झाले होते. यावेळी त्यांनी तिरंग्याशिवाय भारतीय पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहनही केले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर खलिस्तानवाद्यांनी तिरंग्यात गुंडाळलेल्या पुतळ्यांचे दहन केले. त्यांना जाळताना खलिस्तानी भारतविरोधी आणि हिंदुविरोधी घोषणाही देत ​​होते. या घटनेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुन्हा टीकेला सामोरे गेले आहेत. त्याचप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो का, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *