Breaking News

सलग ७ व्यांदा जीएसटी १.५ लाख कोटींच्या वर जीएसटीमधून सप्टेंबरमध्ये १.६३ लाख कोटींचा महसूल

सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून १.६३ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. हा आकडा एका वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत १०.२ टक्के अधिक आहे. त्यावेळी जीएसटीमधून १.४७ लाख कोटी रुपये जमा झाले. तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपयांचा आणि जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता.

सलग सातव्यांदा जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. आत्तापर्यंत सर्वोच्च जीएसटी संकलन एप्रिल २०२३ मध्ये होते, जेव्हा हा आकडा १.८७ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. याशिवाय, सलग १९ महिन्यांपासून देशाचे जीएसटी संकलन १.४ लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ऑगस्ट २०२३ मध्ये जीएसटी महसूल १,६२,७१२ कोटी रुपये होता. यामध्ये CGST २९,८१८ कोटी रुपये, SGST ३७,६५७ कोटी रुपये, IGST ८३,६२३ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या ४१,१४५ कोटी रुपयांसह) आणि उपकर ११,६१३ कोटी रुपये होता. उपकरामध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या ८८१ कोटी रुपयांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये म्हणजेच गेल्या पाच महिन्यांत आतापर्यंत एकूण ९.९३ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन १८.१० लाख कोटी रुपये होते.

सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप ५ राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन १७ टक्के वाढून २५,१३७ कोटी रुपये झाले आहे. या यादीत ११,६९३ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आणि १०४८१ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बिहारमधील संकलन ५ टक्के कमी झाले आहे.

Check Also

एसबीआयमध्ये १२ हजार फ्रेशर्सना संधी ८५ टक्के आयटी क्षेत्रातील नवतरूणांना प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून नियुक्त्या

एसबीआय SBI, देशातील सर्वात मोठी असलेल्या बँकेत, FY25 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि सहयोगी म्हणून १२,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *