Breaking News

अंबादास दानवे यांचा आरोप, गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचं सोंग राजकिय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूरपरिस्थितीला सामोरे जावं लागलं

आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचा सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूर परिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केलं, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला.

अंबादास दानवे यांनी आज नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन पूरग्रस्त नागपूरकरांशी त्यांनी संवाद साधला.

या घटनेला नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हे ही तितकेच जबाबदार असून यांच्यात समनव्य नसल्याचे दिसून आल्याचे अंबादास दानवे यांनी म्हणत प्रशासन यंत्रणेच्या कारभारावरही बोट ठेवलं.

अंबादास दानवे म्हणाले, प्रशासन यंत्रणा घटना घडण्याची वाट बघत होती का अशी स्थिती आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मात्र या भिंतीचे काम हे चार टप्प्यात होणार होते. पहिल्या टप्प्याच काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचा आरोपही केला.

अंबादास दानवे म्हणाले, सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याच काम नव्याने करावं लागेल अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीचे चारही टप्प्यांच्या कामाचा नव्याने डीपीआर बनवून काम लवकरात लवकर हाती घ्यावं, या कामात आमचं सहकार्य राहील अशा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या. प्रशासन यंत्रेणवर नसलेलं नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावं लागत असेल तर हे दुर्दैव असल्याची टीका केली.

यावेळी संपर्क प्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी खासदार प्रकाश जाधव , सुरेखा खोब्रागडे जिल्हा संघटिका, शिल्पा बोडखे पूर्व विदर्भ महिला संघटिका, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *