Breaking News

शरद पवार यांची फुटीरांना सज्जड दम; जीवंतपणी माझा फोटो…. कालच्या वक्तव्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिली समज

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आमच्या पक्षाचे नेते शरद पवार असल्याचे आणि आम्ही अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे अजित पवार गटाकडून जाहिर केले. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाला परवानगीशिवाय फोटो वापरू नका अशी समज दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी फुटीर गटाला दम दिला.

काल अजित पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. तसेच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी केली. त्यानंतर अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, मग तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा सवाल केल्यानंतर अजित पवार यांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार असल्याचे विसरले का असा प्रतिप्रश्न करत एकप्रकारे शरद पवार हेच आमचे नेते असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावर आज स्वतः शरद पवार यांनीच उत्तर देत स्पष्ट केले की, ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचरिक मतभेद आहे. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे, त्या पक्षाने माझा फोटो वापरावा अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असा सज्जड दम शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला.

त्यामुळे आता शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेला पक्षच खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शरद पवार यांच्या लेखी अजित पवार आणि त्यांचा गट एकप्रकारे फुटीर असल्याचे जाहिर केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *