Breaking News

पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…. विपर्यास मी भाजपाची, पण भाजपा माझा नाही

पंकजा मुंडे, भाजपा माझ्या पाठीशी आहे असंच म्हणाल्या मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले.

मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडीच माझा आहे’, असे जाहीर वक्तव्य करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला उद्ग्वेद व्यक्त केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. त्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भाजपा माझ्या पाठिशी आहे, असंच पंकजाताई म्हणाल्या, असे बावनकुळे यांनी सांगितले.

“मी भाजपाची आहे, पण भाजपा ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही असे धाडसी वक्तव्य पंकजा मुंडे यांनी दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केले. त्यामुळे भाजपा आणि राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकलेले आहे. पंकजाताई यांनी भाजपाबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले. पंकजा भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजा ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत असेही स्पष्ट केले.

पुढे बावनकुळे म्हणाले. मध्य प्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरुन त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस नेहमी बोलत असतो. त्या थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असे मला वाटते, अशी सारवासारवही बावनकुळे यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *