Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पडली पार, पण विद्यार्थ्यांना हजेरीच लावता आली नाही आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी परिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेला उपस्थित राहुनही आपली हजेरी दाखविता आली नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

दरम्यान, आजच्या परिक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बायोमेट्रीक हजेरी लावता आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविणार की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. परंतु प्रसंगावधान दाखवित आयोगाकडून बायोमेट्रीक हजेरी दाखविता आली नाही अशा विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशा आशयाचे ट्विट करत आश्वासन दिले.

Check Also

आशिष शेलार यांची टीका, उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका

इंडी आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *