Breaking News

अजित पवार म्हणाले,… पण आजही मी स्वराज्य रक्षक भूमिकेवर ठाम महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी आंदोलनाचे षडयंत्र...

‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून माझ्याविरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केला.

हिवाळी अधिवेशनात विधानसभेत संभाजी महाराज यांच्याविषयी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशन संपल्यानंतर भाजपाकडून राळ उठविण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपाकडून राज्यात काही ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनेही सुरु केली. यापार्श्वभूमीवर काल मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक की धर्मवीर याप्रश्नी सुरु झालेला वाद संपविण्याचे आवाहन केले. त्यानंतर आज विधान भवनातील आपल्या दालनात पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, इतिहास संशोधकांनी या मुद्द्यांवर संशोधन करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करावी. खरा इतिहास समोर आणावा. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल. परंतु राजकीय हेतूने राज्यातील वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशाराही भाजपाला दिला.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गेल्या अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केला. घोषणा करुन आम्ही थांबलो नाही तर, त्यासाठीची आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मी सातत्याने या स्मारकासाठी बैठका घेत होतो, कामाचा आढावा घेत होतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ योजना आम्ही सुरु केली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने यासंबंधी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भारतीय जनता पक्षाला मान्य नाही का ? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *