Breaking News

अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधातील कटात पक्षातील नेताही सहभागी असू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या घरातील बैठकीतील माहिती बाहेर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमिन वाटपाच्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाही जमिन वाटपाचा आणि टीईटी परिक्षेत सत्तार यांच्या मुलींना फायदा दिल्याचाही घोटाळा उघडकीस आला. मात्र ऐन अधिवेशनात हा मुद्दा कोणी बाहेर पुरविला यावरून शिंदे गटातच आता घमासान सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेल्या बैठकीतील माहिती बाहेर आल्याबाबत नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी मुख्यमंत्री शिंदेकडे केली.
तसेच इतकंच नाही तर आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो असं सूचक विधानही अब्दुल सत्तार यांनी केले. अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
या साऱ्या घडामोडींवर एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले,

मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मात्र यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळलं असून यांच्या चौकशा झाल्या तर भुई पळता थोडी होईल असे विरोधकांना उद्देशून बोलताना ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सर्वांचा डेटा जमा आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलले आहेत. मी तर आधीच टीईटीमध्ये एका कागदाचाही फायदा घेतला असेल तर फासावर लटकवा म्हटलं आहे. जोपर्यंत देव माझ्यासह आहे तोपर्यंत काही होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

त्यांच्याविरोधातील कटात कोण सहभागी आहे असं विचारलं असता ते म्हणाले, आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात असा अंदाज व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेली चर्चा बाहेर येत असल्याचं सांगत नाराजी जाहीर केली. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचं सांगितलं. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे असे ते म्हणाले.

विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला इतकं महत्वपूर्ण खातं कसं दिलं याबद्दल काही लोकांच्या मनात खदखद आहे. पण ते त्याचं काम करतात मी माझं काम करतो, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मी राष्ट्रवादी पक्षात आलो नाही याची चीड आहे का? अशी विचारणा केली. मी लोकांसाठी लढत आहे, भांडत आहे, काम करत आहे. काही लोक मात्र फक्त उद्योगपतींसाठी काम करतात असा आरोपही सत्तार यांनी विरोधकांवर केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *