Breaking News

सुषमा अंधारे यांचा सवाल, बापू सूतगिरणी, दुधसंघ, क्रेडिट सोसायटी स्थापन केलेली कुठेय? सोलापूरच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांचा घणाघात

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सध्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघाबरोबरच भाजपा आमदारांच्या मतदारसंघात ही जाहिर सभा घेत आहेत. या अनुषंगाने सुषमा अंधारे या आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच आयोजित जाहिर सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाले, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सूतगिरणी काढली, सरकारकडून जमिन मिळवली, त्याचे शेअर्सही विकले, त्यानंतर पंतगराव कदम यांच्या नावाने क्रेडिट सोसायटी स्थापन केली मात्र या स्थापन केलेल्या क्रेडिट सोसायट्या, सूत गिरणी आणि जमिन कुठे गेली असा सवाल करत बापूंना म्हणे बायकोला साडी घ्यायला २०० रूपये नव्हते मग हे सगळं गेलं कुठे कि असे कोणतं झाडं लावलं की त्याला पैसे आले की ते ही सगळं त्या रफिकभाईला विचारायचं असा खोचक टोला लगावला.

यावेळी पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाले, शहाजीबापू पाटलांनी वसंतदादा पाटलांच्या नावाने सूतगिरणी, पतंगराव कदमांच्या नावाने क्रेडिट सोसायटी आणि राधाकृष्ण दुधसंघानंतर त्यांनी एक कुक्कुटपालनही सुरू केलं होतं. मला वाटलं आमचा नारायणभाऊच कोंबड्यांचा धंदा करतो की काय… पण बापूही कोंबड्यांचा धंदा करत होता. तरीही बापू म्हणाले बायकोला लुगडं घ्यायला दोनशे रुपये नाहीत. माझ्या भावजयीने कसा संसार केला असेल? खानदानी लेकरू होतं म्हणून लेकरानं संसार केला. मला माझ्या भावजयीचा (शहाजीबापू पाटलांची बायको) प्रचंड अभिमान आहे. पण बापू मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अकरा वेळा आमदार झालेल्या आबासाहेबांना जे जमलं नाही, ते तुम्ही अवघ्या दोन वर्षात करून दाखवलं. तुमच्याकडे असं कोणतं पैशांचं झाड लागलंय? ज्यामुळे तुम्ही दोन एकरात कोट्यवधींचा बंगला बांधला, असा खोचक सवाल विचारला.

शहाजीबापू म्हणाले होते की, आपण खूप निष्कलंक माणूस आहे. त्यामुळे बापूला आठवण करून द्यायला पाहिजे. बायकोला साधी २०० रुपयांची साडीही घेता आली नाही, एवढे कष्ट आपण केले, असं बापू म्हणाले होते. पण आता बापूंनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत असे आवाहनही त्यांनी केले.

शहाजीबापू पाटलांना उद्देशून सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, वसंतदादा पाटील यांच्या नावाने तुम्ही जी सूतगिरणी नोंदली होती. त्या सूतगिरणीचे शेअर्सही गोळा झाले होते. याला सरकारने काही अनुदानही दिलं होतं. त्याची काही जमीनही होती. हे सगळं आता कुठे आहे बापू ? ती जमीनही गायब, अनुदानही गायब, शेअर्सचे पैसेही गायब. एवढं सगळं गायब केलं बापू ढेकर तरी द्यायचा की…
दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही पतंगराव कदमांच्या नावाने एक क्रेडिट सोसायटीही सुरू केली होती. ती क्रेडिट सोसायटी कुठे गेली? त्याचे शेअर्स कुठे गेले? त्याचा पैसा कुठे गेला? याबाबत बापूला विचारलं पाहिजे. बापू तुम्ही राधाकृष्ण दुधसंघही स्थापन केला होता. त्या दूधसंघाचं काय झालं? हे जुन्या-जाणत्या लोकांना माहीत असेल,” अशी टीका अंधारेंनी केली.

बापू प्रत्येक नव्या मुख्यमंत्र्याला बघून म्हणतं, मी त्यांच्या लेकरासारखा आहे. माझा भाऊ जेव्हा मुख्यमंत्री झाला, त्यावेळी बापू म्हणाले, मी त्यांच्या लेकरासारखा. बरं एकनाथ शिंदेची जन्मतारीख ६४ आणि बापूचा जन्म ६७ सालचा. त्या आधी पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळीही बापूचंही तेच वाक्य त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तेच वाक्य. बापूंना एकच सांगते बापू बाप एकच असतो. तो सारखा बदलत नसतो असे सांगत खोचक टोलाही लगावला.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *