Breaking News

Tag Archives: shahaji bapu patil

देशातील पहिला कॅनल जोड प्रकल्प सोलापूरात, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. …

Read More »

सुषमा अंधारे यांचा सवाल, बापू सूतगिरणी, दुधसंघ, क्रेडिट सोसायटी स्थापन केलेली कुठेय? सोलापूरच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांचा घणाघात

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सध्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघाबरोबरच भाजपा आमदारांच्या मतदारसंघात ही जाहिर सभा घेत आहेत. या अनुषंगाने सुषमा अंधारे या आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच आयोजित जाहिर सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाले, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सूतगिरणी काढली, सरकारकडून जमिन मिळवली, …

Read More »

अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कलगीतूरा, बारकी पोरंही… टोला प्रति टोल्याने दोघांतील वादांत वाढतेय रंगत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे अमोल मिटकरींनी शहाजीबापूंना शिंदे गटातले जॉनी लिव्हर म्हटल्यानंतर शहाजीबापूंनीही मिटकरींना सोंगाड्याची उपमा देत टोला लगावला. या पाठोपाठ आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी शहाजीबापू पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. …

Read More »

अमोल मिटकरींच्या टीकेला उत्तर देताना शहाजी बापू म्हणाले, रोज नटून-थटून दाढीला… ते सोंगाड्या आहेत मात्र त्याचा काही उपयोग नाही

राज्यात एकीकडे सामाजिक आणि राजकीय नेत्यांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे राजकारण आणि राजकीय टोलेबाजी देखील दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’फेम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांना शिंदे गटातील जॉनी लिव्हर असल्याची खोचक टीका केली. मिटकरी यांच्या या …

Read More »

शिंदे समर्थक आमदारांच्या त्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रेंडशिप डे… उध्दव ठाकरेंबरोबर मैत्री होणार का? यावर बोलणे टाळले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर सुरुवातीला उध्दव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणाऱ्या या बंडखोरांनी नंतरच्या कालावधीत मात्र उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र आज नेमके फ्रेंडशिप डे चे औचित्य साधत एकनाथ शिंदे …

Read More »