Breaking News

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत

नुकतेच उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटातील अनेक जण परत येतील अशी घोषणा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केली होती. मात्र ठाकरे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांनी उध्दव ठाकरेंची मशाल सोडत एकनाथ शिंदेंची ढाल-तलवार हाती घेत धक्का दिला. त्यापाठोपाठ आता उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनीही आत शिंदे गटात आज प्रवेश केला. त्यांचे स्वागत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा शिंदे गटात सुरु झाली आहे.

उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यासह माजी आमदार योगेश पाटील आणि ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.

किर्तीकर यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला असतानाच, रविवारी शिंदे गटाने रविवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आंनद मठात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील, ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी धक्का दिला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे सरकार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा मात्र काही केल्या अद्याप शिंदे गटात पक्षप्रवेश झालेला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होते. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिले. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला असल्याचे समजते.  दिपाली सय्यद यांनी आधी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या ठाणे शहराध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी केली आहे. भाजपाच्या विरोधामुळेच तर ऐनवेळेस दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश तर रद्द झाला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Check Also

भरसभेत तरूणाने पंतप्रधान मोदींकडे केली मागणी, कांद्यावर बोलाः पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक ) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिरसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *